सुविद्या प्रसारक संघ

II सुविद्यया प्राप्यते यश: II

Success can be achieved by good knowledge.

“सुविद्यया प्राप्यते यश:” असे बोधवाक्य असलेल्या सुविद्या प्रसारक संघाच्या आज बोरिवली उपनगरात चार शाळा व एक कनिष्ठ महाविद्यालय आहे व त्यामध्ये सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ही गोष्ट आपणा सर्वांनाच अभिमानाची आहे.

आज एवढा विस्तार पावलेल्या सु. प्र. संघाचे बीजारोपण ४ एप्रिल १९७१ रोजी वर्षप्रतिपदेच्या (गुढीपाडवा) मुहूर्तावर सहकारी गृहनिर्माण संकल्पनेचे अध्वर्यू कै. श्री. मोरेश्वर विष्णू परांजपे यांच्या प्रेरणेने झाले. त्यांच्यासोबत निष्ठेने, धडाडीने, कल्पकतेने व नि:स्वार्थीपणे काम करणारे संस्थापक सदस्य होते ---कै. श्री. गो. रा. रानडे, श्री. व. रा. खांडेकर, श्री. दि. त्रिं. जोशी, कै. श्री. बा. ग. गोवंडे, श्री. श्री. वि. देसाई, कै. श्री. ग. त्र्यं. मराठे, कै. श्री. गो. के. केतकर, श्री. वि. के. काणे, कै. श्रीम. सु. के. जोशी आणि कै. श्रीम. क. ग. पटवर्धन.

सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर पहिल्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

कै. श्री. गो. रा. रानडे – कार्याध्यक्ष श्री. नी. गं. देशपांडे – कार्यवाह
श्रीम. क. ग. पटवर्धन – कोषाध्यक्ष श्री. मो. वि. परांजपे – सदस्य
श्री. व. रा. खांडेकर – सदस्य श्री. वि. के. काणे – सदस्य
कै. श्री. ग. त्र्यं. मराठे – सदस्य  

आज संस्थेच्या चार शाळांतील पूर्व प्राथमिक विभाग उत्तम तऱ्हेने कार्यरत आहेत. बालकांच्या नैसर्गिक प्रवृत्तींचा उपयोग करून अनौपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून बालशिक्षणाचे प्रशंसनीय कार्य करीत आहेत. या कार्याची दाखल महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेने सुद्धा घेतली आहे व तशा आशयाची प्रमाणपत्रे तीनही शाळांना प्रदान करण्यात आली आहेत. अतिशय कमी विद्यार्थी संख्येने सुरू झालेला पूर्व प्राथमिक विभाग आज अनेक बालकांना घडविण्याचे कार्य करीत आहे. पूर्व प्राथमिक विभागाच्या जडणघडणीत संस्थेच्या संस्थापक सदस्या कै. श्रीम. सुषमा जोशी यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे.