सोसायटी फार एन्व्हायरन्मेंट अँड आर्किटेक्चर व सुविद्या प्रसारक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या स्कूल आफ एन्व्हायरन्मेंट अँड आर्किटेक्चरने पाच वर्षे पूर्ण केली असून पहिली बॅच B.Arch. पदवी घेऊन यंदा बाहेर पडत आहे. तज्ञ व्याख्याते, मॉड्यूल पद्धतीचे अध्यापन, विविध उपक्रम, प्रयोगशीलता, इत्यादींमुळे थोडयाच अवधीत हे स्कूल चांगल्याप्रकारे नावारूपाला आले आहे. विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी या स्कूलला अग्रक्रमाने पसंती मिळत आहे.
संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जनसेवा केंद्र व सुविद्या प्रसारक संघ यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने विवेकानंद प्रबोधिनी स्थापन करण्यात येऊन MPSC, UPSC स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वंकष विकास व्हावा या उद्देशाने इयत्ता 6 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी फाऊंडेशन लेव्हल 1 आणि फाऊंडेशन लेव्हल 2 असे अभ्यासक्रम व सिनिअर कॉलेजच्या आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी प्रगत अभ्यासक्रम अशी रचना करण्यात आली आहे.