सुविद्या प्रसारक संघ

II सुविद्यया प्राप्यते यश: II

Success can be achieved by good knowledge.


नमस्ते !

भारतीय संस्कृतीने गुरूला माता-पित्याइतकेच महत्त्व कायमच दिले आहे. नव्याने शाळेत प्रवेश करणारे व स्वत:च्या आईपासून काही वेळ दूर होणारे बालक शाळेच्या बालमंदिरातील शिक्षिकांमध्ये आई शोधत असते. या शिक्षिकांकडूनच त्याला हवे ते लक्ष, प्रेम, काळजी सर्वच मिळते आणि शाळेशी त्याचे ऋणानुबंध जुळतात ते कायमचेच. आणि त्यामुळेच वय कितीही वाढले तरी शाळेबद्दल प्रत्येकाच्या मनात आपुलकीचीच भावना असते. व्यक्ती कितीही उच्चशिक्षित, कर्तबगार असली तरी आईच्या आणि शाळेच्या सहवासात येऊन पुन्हा बालपण अनुभवत असते. समाजाने ही मायलेकाचे नाते श्रेष्ठ मानले आहे. हे मातृ-ऋण सहज विसरता येणार नाही व त्याची पूर्ण-परतफेड सर्वथा अशक्यच आहे. या ऋणाची अंशत: परतफेड करण्याचा विचार मात्र समाजाने व संस्थेशी संबंधित माजी विद्यार्थ्यांनी अवश्य केला पाहिजे.

सामाजिक संस्था, समाजातील मान्यवर, दानशूर आणि माजी विद्यार्थी यांनी त्यांच्या अनुभवांचा, ज्ञानाचा, कौशल्यांचा व त्यांच्याकडील उपलब्ध वेळेचा लाभ शाळेला करून द्यावा. आर्थिक मदतीइतकीच शाळेला या सर्व बाजूनी केलेल्या मदतीचीही अपेक्षा आहे. तसेच भविष्यात योजलेल्या प्रकल्पांसाठी शाळेला मदत करू इच्छिणाऱ्यांचे शाळा व संस्था नेहमीच स्वागत करते आणि पुढेही करेल.

सुविद्या प्रसारक संघाच्या सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रम यांमध्ये सर्व सरकारी नियम व दंडकांचे कसोशीने पालन केले जाते. तसेच संस्थेची धर्मादाय आयुक्त कार्यालयात रीतसर नोंदणी (डिसेंबर १९७१) करण्यात आली आहे. याची अवश्य नोंद घ्यावी.

आताच ऑनलाइन देणगी द्या.

---- किंवा (OR)---

आर्थिक मदतीसाठी आवश्यक माहिती पुढीलप्रमाणे ---

सुविद्या प्रसारक संघ NEFT/RTGS साठी आवश्यक माहिती ---
बँक खात्याचे नाव : Suvidya Prasarak Sangh
बँक : TJSB Sahakari Bank Ltd.
बँक खाते क्रमांक (Savings) : 024110100000445
शाखा : Borivali (West), Mumbai.
IFSC कोड : TJSB0000024bank

NEFT/RTGS पद्धतीने व्यवहार पूर्ण झाल्यावर कृपया खालील माहिती इ-मेलद्वारा पुढील इ-मेल पत्त्यावर अवश्य पाठवावी. इ-मेल : contact@suvidya.education

देणगीदाराचे नाव –
देणगीदाराचा पॅन कार्ड क्रमांक –
व्यवहाराचा दिनांक –
रक्कम - ₹
ट्रान्झक्शन आयडी –
देणगीदाराच्या बँकेचे नाव –
IFSC कोड -
देणगीचा उद्देश -

विशेष सूचना : आयकरातून देणगी रकमेच्या पन्नास टक्के रक्कम वजावटीस देणगीदार पात्र असेल.