सुविद्या प्रसारक संघ

II सुविद्यया प्राप्यते यश: II

मनोहर हरिराम चोगले विद्यालय

INTRODUCTION

“सुविद्यया प्राप्यते यश: असे बोधवाक्य असलेल्या सुविद्या प्रसारक संघाच्या आज बोरीवली उपनगरात चार शाळा व एक कनिष्ठ महाविद्यालय आहे व त्यामध्ये जवळजवळ पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही गोष्ट आपणा सर्वांनाच अभिमानाची आहे.

आज एवढा विस्तार पावलेल्या सु.प्र.संघाचे बीजारोपण 4 एप्रिल 1971 रोजी वर्षप्रतिपदेच्या(गुढी पाडवा) शुभ मुहूर्तावर सहकारी गॄहनिर्माण संकल्पनेचे अध्वर्यु कै.श्री.मोरेश्वर विष्णू परांजपे यांच्या प्रेरणेने झाले. त्यांच्यासोबत निष्ठेने, धडाडीने, कल्पकतेने व नि:स्वार्थीपणे काम करणारे संस्थापक सदस्य होते श्री.गो.रा.रानडे, श्री.व.रा.खांडेकर, श्री.दि.त्रिं.जोशी, श्री.बा.ग.गोवंडे, श्री.नी.गं.देशपांडे, श्री.श्री.वि.देसार्इ, श्री.ग.त्रयं.मराठे, कै.श्री.गो.के.केतकर, श्री.वि.के.काणे, श्रीमती सु.के.जोशी आणि श्रीमती क.ग.पटवर्धन.

सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर पहिल्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली :

श्री.गो.रा.रानडे - कार्याध्यक्ष श्री.नी.गं.देशपांडे - कार्यवाह
श्रीमती क.ग.पटवर्धन - कोषाध्यक्ष श्री.मो.वि.परांजपे - सदस्य
श्री.व.रा.खांडेकर - सदस्य श्री.वि.के.काणे-सदस्य
श्री.ग. त्रयं.मराठे - सदस्य  

आज संस्थेच्या चार शाळातील पूर्व प्राथमिक विभाग उत्तम तáहेने कार्यरत आहेत. बालकांच्या नैसर्गिक प्रवॄत्तींचा उपयोग करून अनौपचारीक शिक्षणाच्या माध्यमातून बालशिक्षणाचे प्रशंसनीय कार्य करीत आहेत. त्या कार्याची दखल महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेने घेतली आहे. तशा आशयाचे प्रमाणपत्र तीनही शाळाना प्रदान करण्यात आले आहे. अतिशय कमी विद्यार्थी संख्येने सुरू झालेला पूर्व प्राथमिक विभाग आज अनेक बालकांना घडविण्याचे कार्य करीत आहे. पूर्व प्राथमिक विभागाच्या जडणघडणीत संस्थेच्या संस्थापक सदस्या श्रीमती सुषमा जोशी ह्मांचे योगदान अतिशय मोलाचे आहे.