सुविद्या प्रसारक संघ

II सुविद्यया प्राप्यते यश: II

मनोहर हरिराम चोगले विद्यालय

सु.प्र. संघाचे मनोहर हरिराम चोगले विद्यालय माध्यमिक विभाग


२७ जून १९९४ रोजी गोराई विद्यालयाचा माध्यमिक विभाग सुरू झाला. सुरवातीला इयात्ता ५ वी व इयत्ता ८ वी चा १-१ वर्ग सुरू झाला. १९९६ मध्ये मा. श्री. सु.ग. शेवडे यांच्या हस्ते शाळेचे नामकरण सु.प्र. संघाचे मनोहर हरिराम चोगले विद्यालय असे करण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०१८- १९ हे वर्ष शाळेचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. गेले २५ वर्ष मनोहर हरिराम चोगले विद्यालय हि शाळा गोराई चारकोप विभागात मराठी माध्यमाची सर्वोत्तम शाळा म्हणून नावलौकिक मिळवीत आहे .