सुविद्या प्रसारक संघ

II सुविद्यया प्राप्यते यश: II

मनोहर हरिराम चोगले विद्यालय

मनोहर हरिराम चोगले विद्यालय पूर्व प्राथमिक विभाग


सुविद्या प्रसारक संघाने गोराई परिसरातील वाढती लोकवस्ती पाहता शैक्षणिक सोय उपलब्ध करून देण्याकरिता सन १९९३ साली गोराई विद्यालयाची स्थापना करून पूर्व प्राथमिक विभाग आणि इ.१ली च्या वर्गाला सुरुवात केली. सुविद्या प्रसारक संघाच्या नि:स्वार्थी आणि समर्पण भावनेतून केलेल्या कार्यामुळे संघाला अनेक हितचिंतक आणि देणगीदार लाभले. कै. श्री. मनोहर हरिराम चोगले हे त्यापैकीच एक. त्यांनी शाळेला भरघोस अशी देणगी दिली. त्यानंतर ‘गोराई विद्यालयाचे’ नामकरण ‘मनोहर हरिराम चोगले विद्यालय’ असे करण्यात आले. संस्थाचालकांचे मार्गदर्शन, प्रशिक्षित असा शिक्षक वर्ग,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थांची मेहनत यामुळे लवकरच आमची शाळा नावारूपास आली. आमचा पूर्व प्राथमिक विभाग म्हणजे शैक्षणिक प्रवासाची पहिली पायरी म्हणता येईल. अनौपचारिकरित्या आनंददायी शिक्षण पद्धतीचा वापर करून विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने संपूर्ण अभ्यासक्रमाचे नियोजन केलेले असते. त्याकरिता भाषा, अंकगणित, सामान्यज्ञान या विषयांची ओळख शैक्षणिक साधने आणि वर्कशिटद्वारे करून दिली जाते. विद्यार्थ्यांमध्ये असणार्‍या सृजनशीलतेच्या वाढीकरिता शैक्षणिक अभ्यासक्रमात चित्रकला आणि हस्तकला या विषयांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांमधील आकलनशक्ती, निरीक्षण क्षमता, बौद्धिक क्षमता यांचा विकास साधण्याच्या दृष्टीने विविध शैक्षणिक उपक्रम आणि आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन केले जाते. शारीरिक विकासाकरिता आपल्या शाळेला भव्य असे पटांगण लाभले आहे. त्याजोडीला विविध प्रकारची क्रीडा साधनेही उपलब्ध आहेत. कलागुणांचा विकास साधण्याकरिताही प्रयत्न केले जातात. त्याकरिता सुसज्ज असे सभागृहदेखील आहे. असा हा आमचा पूर्व प्राथमिक विभाग विद्यार्थ्यांच्या स्वागताला नेहमीच तयार आहे.


श्रीम. जान्हवी किरण गुजराथी
मुख्याध्यापिका
पूर्व प्राथमिक विभाग म.ह.चोगले विद्यालय