सुविद्या प्रसारक संघ

II सुविद्यया प्राप्यते यश: II

मनोहर हरिराम चोगले विद्यालय

सु.प्र.संघाचे म.ह.चोगले विद्यालय गोराई प्राथमिक विभाग

सु.प्र.संघाने वाढत्या गोराई परिसराची निकड लक्षात घेऊन सन 1993 साली गोराई विद्यालयाची स्थापना करण्यात आली.प्रथम शिक्षिका म्हणून कु.जयश्री रानडे यांनी आनंदाने शाळेचा कार्यभार सांभाळला.त्यानंतर सन 1996साली मुख्याध्यापक म्हणून श्री.द.ठ,पवार यांची नियुक्ती करण्यात आली. सुविद्यालयाप्रमाणेच विविध उपक्रम,संस्कार यामुळे विद्यार्थी संख्या भरपूर वाढून शाळा नावारूपास आली. मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मेहनतीची व कार्याची दखल घेत शासनाने सन 2000मध्ये आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरविले. शाळेत विविध उपक्रम,स्पर्धा याद्वारे विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न घडवण्यासाठी अधिकाअधिक प्रयत्न केले जातात.शाळेचा नावलौकिक वाढावा व विद्यार्थ्यानी सुयश प्राप्त करावे यासाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक सतत प्रयत्नशील असतात.