Sr No. | From Date | To Date | Event Name | Event Description |
---|---|---|---|---|
1 | १७/०६/२०१९ | १७/०६/२०१९ | शाळेचा पहिला दिवस- स्वागतोत्सव | श्रीगणेशाचे पूजन करून सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात येईल. |
2 | २०/०६/२०१९ | २०/०६/२०१९ | बालकविहार- पहिला दिवस | श्रीगणेशाचे पूजन करून सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात येईल. |
3 | २६/०६/२०१९ | २६/०६/२०१९ | महिनाअखेर | अर्धा दिवस शाळा - नवीन कपडे - रंग - लाल,डबा-दप्तर आणू नये.बालवर्ग - बालसभा विषय- सुट्टीतील गमती-जमती |
4 | ०१/०७/२०१९ | ०१/०७/२०१९ | पूर्णवेळ शाळा सुरू | बालवर्ग -स.८-३० ते ११-३०, शिशुवर्ग- स.८-३० ते ११, बालकविहार- स.११ ते १ |
5 | ०१/०७/२०१९ | ०५/०७/२०१९ | वनमहोत्सव | कुंडीत बी पेरणे - प्रात्यक्षिक |
6 | १२/०७/२०१९ | १२/०७/२०१९ | आषाढी एकादशी | दिंडी काढणे,रंगीत कपडे - वारकरी पोषाख,डबा- दप्तर आणू नये.तीनही वर्ग एकत्र स.९ ते ११ |
7 | १३/०७/२०१९ | १३/०७/२०१९ | प्रथम सत्र - पालक सभा | शालेय अभ्यासक्रम, शैक्षणिक उपक्रम याविषयी माहिती सांगण्यात येईल. |
8 | १६/०७/२०१९ | १६/०७/२०१९ | गुरुपौर्णिमा | गुरु-शिष्यांच्या गोष्टी आणि माहिती सांगण्यात येईल. |
9 | ३०/०७/२०१९ | ३०/०७/२०१९ | जीवनव्यवहार | जीवनव्यवहार साधनांची मांडणी करणे. |
10 | ३०/०७/२०१९ | ३०/०७/२०१९ | जीवन व्यवहार | जीवन व्यवहार साधनांची मांडणी करण्यात येईल. |
11 | ३१/०७/२०१९ | ३१/०७/२०१९ | दिपपूजा | जुन्या- नव्या दिव्यांची आरास करून पूजा करण्यात येईल. दिव्यांची माहिती आणि महत्व सांगण्यात येईल. |
12 | ३१/०७/२०१९ | ३१/०७/२०१९ | महिनाअखेर | अर्धा दिवस शाळा - नवीन कपडे - रंग- पिवळा ,डबा-दप्तर आणू नये. बालवर्ग -बालसभा विषय - पावसाळा |
13 | ०१/०८/२०१९ | ०१/०८/२०१९ | लोकमान्य टिळक पुण्यतिथि | लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांची माहिती आणि गोष्ट सांगण्यात येईल. |
14 | ०५/०८/२०१९ | ०५/०८/२०१९ | नागपंचमी | वारुळाचे सुशोभन मांडून, विद्यार्थ्यांकडून चिकणमातीचे नाग बनवून घेण्यात येतील. |
15 | ०९/०८/२०१९ | ०९/०८/२०१९ | श्रावणी शुक्रवार | विद्यार्थ्यांचे औक्षण करून, चणे-दाणे प्रसाद म्हणून देण्यात येतील. |
16 | १२/०८/२०१९ | १२/०८/२०१९ | बकरी ईद | पूर्व प्राथमिक विभागाला सुट्टी |
17 | १४/०८/२०१९ | १४/०८/२०१९ | रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन | रक्षाबंधन - सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधण्यात येईल.,रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमेची माहिती सांगण्यात येईल. स्वातंत्र्यदिन - सुशोभन मांडून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यादिनाचे महत्व आणि माहिती सांगण्यात येईल. देशभक्तीपर गाणी म्हणण्यात येतील. |
18 | १५/०८/२०१९ | १५/०८/२०१९ | स्वातंत्र्यदिन | पूर्व प्राथमिक विभागाला सुट्टी |
19 | २३/०८/२०१९ | २३/०८/२०१९ | श्रीकृष्ण जन्मोत्सव | सुशोभन मांडून जन्मोत्सव साजरा करण्यात येईल. .श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगून, गाणी म्हणून दहीहंडी फोडण्यात येईल. |
20 | २७/०८/२०१९ | २७/०८/२०१९ | मंगळागौर | मंगळागौरीची पूजा मांडून गाणी म्हणण्यात येतील आणि खेळ खेळण्यात येतील. वनौषधींचे प्रदर्शन मांडण्यात येईल. |
21 | २७/०८/२०१९ | २८/०८/२०१९ | गणेशोत्सवानिमित्त - आरती पाठांतर | बालकविहार- गणपतीची बारा नावे, शिशुवर्ग - सुखकर्ता-दुःखहर्ता, बालवर्ग - शेंदूर लाल चढायो. |
22 | २९/०८/२०१९ | २९/०८/२०१९ | मातृदिन | सुशोभन मांडून मातेविषयी असणारा आदर, तिची महती विद्यार्थ्यांना गोष्टीतून सांगण्यात येईल. |
23 | ३०/०८/२०१९ | ३०/०८/२०१९ | महिनाअखेर | अर्धा दिवस शाळा -रंगीत कपडे -रंग-निळा, डबा-दप्तर आणू नये.बालवर्ग - बालसभा विषय-श्रीकृष्णाच्या गोष्टी |
24 | ०२/०९/२०१९ | ०६/०९/२०१९ | गणेशोत्सवानिमित्त | पूर्व प्राथमिक विभागाला सुट्टी |
25 | १०/०९/२०१९ | १०/०९/२०१९ | मोहरमनिमित्त | पूर्व प्राथमिक विभागाला सुट्टी |
26 | १२/०९/२०१९ | १२/०९/२०१९ | अनंत चतुर्दशीनिमित्त | पूर्व प्राथमिक विभागाला सुट्टी |
27 | ३०/०९/२०१९ | ३०/०९/२०१९ | घटस्थापना | नवरात्र उत्सव प्रारंभ -घटस्थापना करून पूजा करण्यात येईल, भोंडला खेळण्यात येईल. |
28 | ३०/०९/२०१९ | ३०/०९/२०१९ | महिनाअखेर | अर्धा दिवस शाळा - रंगीत कपडे - रंग -हिरवा, डबा-दप्तर आणू नये. बालवर्ग - बालसभा - विषय -माझी आई |
29 | ०२/१०/२०१९ | ०२/१०/२०१९ | महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त | पूर्व प्राथमिक विभागाला सुट्टी |
30 | ०४/१०/२०१९ | ०४/१०/२०१९ | पालक - शिक्षक भेट | तोंडी मूल्यमापानासंदर्भात माहिती देण्यात येईल. |
31 | ०७/१०/२०१९ | ०७/१०/२०१९ | पाटीपूजन - भोंडला | पाटीपूजन करून, गरबा खेळून, प्रसाद देण्यात येईल.. तीनही वर्ग एकत्र - स. - ९ ते ११ नवीन शैक्षणिक वर्षाच्या नाव नोंदणीस सुरुवात - स. ८-३० ते १०-३० |
32 | ०८/१०/२०१९ | ०८/१०/२०१९ | विजयादशमीनिमित्त | पूर्व प्राथमिक विभागाला सुट्टी |
33 | १४/१०/२०१९ | २२/१०/२०१९ | प्रथमसत्र तोंडी मूल्यमापन | प्रथम सत्र अभ्यासक्रमावर आधारीत तोंडी मूल्यमापनास सुरुवात |
34 | २४/१०/२०१९ | २४/१०/२०१९ | दीपोत्सव | सुशोभन मांडून, दिव्यांची रोषणाई करून, गाणी म्हणून दीपोत्सव साजरा करण्यात येईल. |
35 | २५/१०/२०१९ | १२/११/२०१९ | दिवाळीनिमित्त | पूर्व प्राथमिक विभागाला सुट्टी |
36 | १३/११/२०१९ | १३/११/२०१९ | द्वितीय सत्र - पहिला दिवस | अर्धा दिवस शाळा |
37 | १४/११/२०१९ | १४/११/२०१९ | बालदिन | विद्यार्थ्यांना पंडित नेहरूंची माहिती सांगण्यात येईल.. जादूचे प्रयोग दाखविण्यात येतील. |
38 | २०/११/२०१९ | २१/११/२०१९ | पसायदान पाठांतर | बालवर्गाच्या विद्यार्थ्यांचे पसायदान पाठांतर घेण्यात येईल. |
39 | २५/११/२०१९ | २५/११/२०१९ | संत ज्ञानेश्वर महाराज समाधी दिन | सुशोभन मांडून गोष्ट सांगण्यात येईल. पसायदान पाठांतर असणार्या विद्यार्थांना प्रशस्तीपत्र देण्यात येतील. |
40 | २८/११/२०१९ | २८/११/२०१९ | सहवास शिबीर | फक्त बालवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सहवास शिबिराचे आयोजन करण्यात येईल. |
41 | २९/११/२०१९ | २९/११/२०१९ | सहवास शिबीरनिमित्त | पूर्व प्राथमिक विभागाला सुट्टी |
42 | ०२/१२/२०१९ | ०५/१२/२०१९ | वन्यप्राणी सप्ताह | सुशोभन मांडून रोज एका प्राण्याची माहिती सांगण्यात येईल. |
43 | ०६/१२/२०१९ | ०६/१२/२०१९ | डॉ. आंबेडकर पुण्यतिथिनिमित्त | पूर्व प्राथमिक विभागाला सुट्टी |
44 | १३/१२/२०१९ | १३/१२/२०१९ | शालेय चित्रकला स्पर्धा | फक्त शिशुवर्ग आणि बालवर्गाकरिता - विषय - कोणतेही आवडीचे चित्र काढणे. |
45 | १७/१२/२०१९ | १८/१२/२०१९ | क्रीडामहोत्सव | बालकविहार, शिशुवर्ग, बालवर्ग प्रत्येक वर्गाच्या दोन स्पर्धा घेण्यात येतील. |
46 | १९/१२/२०१९ | १९/१२/२०१९ | क्रिडामहोत्सवानिमित्त | पूर्व प्राथमिक विभागाला सुट्टी |
47 | २०/१२/२०१९ | २०/१२/२०१९ | संत गाडगेबाबा पुण्यतिथी | स्वच्छता दिन म्हणून साजरा करण्यात येईल. . शारीरिक आणि परिसर स्वच्छतेची साधने दाखविण्यात येतील , शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात येईल. |
48 | २४/१२/२०१९ | २५/१२/२०१९ | नाताळनिमित्त | पूर्व प्राथमिक विभागाला सुट्टी |
49 | ३१/१२/२०१९ | ३१/१२/२०१९ | शालेय चित्रकला स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धा यांचा बक्षिस समारंभ, महिनाअखेर | तीनही वर्ग एकत्र -स. ९ ते ११ बक्षिस समारंभ साजरा करण्यात येईल. |
50 | ०१/०१/२०२० | ०१/०१/२०२० | नववर्षानिमित्त | पूर्व प्राथमिक विभागाला सुट्टी |
51 | ०९/०१/२०२० | ०९/०१/२०२० | सहल | तीनही वर्गांची एकत्र सहल - स्थळ -पोयसर जिमखाना |
52 | १०/०१/२०२० | १०/०१/२०२० | सहलीनिमित्त | पूर्व प्राथमिक विभागाला सुट्टी |
53 | १५/०१/२०२० | १५/०१/२०२० | मकरसंक्रांतीनिमित्त | पूर्व प्राथमिक विभागाला सुट्टी |
54 | १८/०१/२०२० | १८/०१/२०२० | मकरसंक्रांतीनिमित्त पालक मेळावा | पालक प्रबोधनपर व्याखान आणि पालकांच्याकरिता विविध स्पर्धांचे आयोजन |
55 | २३/०१/२०२० | २४/०१/२०२० | श्री गणेश जयंतीनिमित्त | पाठांतर घेणे - बालकविहार - गणपतीचे दोन श्लोक, शिशुवर्ग - गणपति स्तोत्र, बालवर्ग -मारुती स्तोत्र |
56 | २८-०१-२०२० | २८-०१-२०२० | श्री गणेश जयंती | श्री गणेश जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या पाठांतराचे प्रशस्तीपत्र वितरण करण्यात येईल. |
57 | ३०/०१/२०२० | ३०/०१/२०२० | जीवन व्यवहार | जीवन व्यवहार - वर्ग मांडणी करण्यात येईल. |
58 | ३१/०१/२०२० | ३१/०१/२०२० | महिनाअखेर | अर्धा दिवस शाळा - नवीन कपडे - रंग - काळा, डबा-दप्तर आणू नये. बालवर्ग - बालसभा विषय - स्वातंत्र्यवीर गोष्टी |
59 | ०५/०२/२०२० | ०५/०२/२०२० | वैद्यकीय तपासणी | सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. |
60 | १३/०२/२०२० | १४/०२/२०२० | श्री रामदासनवमीनिमित्त | मनाचे श्लोक पाठांतर - शिशुवर्ग - १ ते ५ श्लोक , बालवर्ग - १ ते १५ श्लोक |
61 | १७/०२/२०२० | १७/०२/२०२० | श्री रामदासनवमी | पसायदान पाठांतर प्रशस्तीपत्र वितरण करण्यात येईल. |
62 | १८/०२/२०२० | १८/०२/२०२० | शिवजयंती | सुशोभन मांडून शिवरायांच्या गोष्टी आणि माहिती सांगण्यात येईल. |
63 | १९/०२/२०२० | १९/०२/२०२० | शिवजयंतीनिमित्त | पूर्व प्राथमिक विभागाला सुट्टी |
64 | २८/०२/२०२० | २८/०२/२०२० | राष्ट्रीय विज्ञान दिन, महिनाअखेर | विज्ञान प्रयोग प्रात्यक्षिक दाखविण्यात येईल, अर्धा दिवस शाळा - नवीन कपडे - रंग-पांढरा डबा-दप्तर आणू नये. |
65 | ०९/०३/२०२० | ०९/०३/२०२० | होळी | विद्यार्थांना होळीची माहिती सांगून नैसर्गिक रंग लावण्यात येतील. |
66 | १०/०३/२०२० | १०/०३/२०२० | धूलिवंदनानिमित्त | पूर्व प्राथमिक विभागाला सुट्टी |
67 | २६/०३/२०२० | २६/०३/२०२० | लेखी मूल्यमापन | फक्त बालवर्गातील विद्यार्थ्यांचे भाषा विषयाचे लेखी मूल्यमापन घेण्यात येईल. |
68 | २७/०३/२०२० | २७/०३/२०२० | लेखी मूल्यमापन | फक्त बालवर्गातील विद्यार्थ्यांचे गणित विषयाचे लेखी मूल्यमापन घेण्यात येईल. |
69 | ३१/०३/२०२० | ३१/०३/२०२० | शुभाषिश समारंभ | फक्त बालवर्गातील विद्यार्थ्यांचा शुभाषिश समारंभ साजरा करण्यात येईल. पालकांना पहिलीच्या प्रवेशासंबंधी सूचना देण्यात येतील. |
70 | ०७/०४/२०२० | ०७/०४/२०२० | सामुहिक वाढदिवस | सर्व विद्यार्थ्यांचा सामुहिक वाढदिवस साजरा करण्यात येईल. मंत्रोच्चारातून आशीर्वाद देण्यात येतील, भेटवस्तू देण्यात येईल. |