सुविद्या प्रसारक संघ

II सुविद्यया प्राप्यते यश: II

श्री. मंगुभाई दत्ताणी विद्यालय

योजना विद्यालय

दि. ०६/०१/१९८८ ते १३/०१/१९८८ मागाठाणे बोरिवली पूर्व येथील जय महाराष्ट्रनगर वसाहतीतील व अन्य भागातील नागरिकांची सभा घेऊन त्या भागात संस्थेतर्फे सुरु करावयाच्या शाळेबाबतचे निवेदन मा. श्री. गो.रा.रानडे - कार्याध्यक्ष व श्रीम. नीलाताई जोशी यांनी केले. सभेला १२५ चे वर नागरिक उपस्थित होते. अन्य वसाहातीतील प्रतिसाद उत्तम होता. बोरिवली पूर्वेकडील परिसरातही मराठी माध्यमाच्या शाळेची अत्यंत गरज आहे हे मा. श्री गो. रा. रानडे यांच्या लक्षात आले आणि त्यांनी संस्थेच्या वतीने ०७/०२/१९८८ ला मागाठाणे येथे जून १९८८ पासून सुरु करण्याच्या वर्गांसाठी कच्या शालेय इमारतीचा शुभारंभ गणेश पूजनाने करण्यात आला. दि. १५/०६/१९८८ मागाठाणे- योजना विद्यालयाचा शुभारंभ सकाळी ७.३० वाजता झाला. पूर्व प्राथमिक-शिशुवर्ग, बालवर्ग आणि ५ वी व ८वी चे वर्ग सुरु झाले. शाळेच्या नियोजित कै. मा. श्रीम सुहासिनी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत शाळेची पहिली घंटा वाजली. आणि ' सूर्य प्रकाशे आकाशी, जगात भरलाय आनंद' या प्रार्थनेने शाळेचा औपचारिक प्रारंभ झाला. दि.२०/१०/१९८८ दसऱ्याच्या शुभदिनी मागाठाणे विद्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ सकाळी ७.३० वाजता कार्याध्यक्ष श्री. गो. रा. रानडे यांच्या हस्ते झाला. कोनशिला समारंभ महापालिका उपा.आयुक्त श्री अरविंद मादुस्कर यांच्या हस्ते होऊन समारंभाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते. दि.२६/०९/१९९६ रोजी योजना या नावाचे पुन्हा एकदा नामकरण झाले आणि नवे नाव रुजले. श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय. दि.१३/०६/२०१३ योजना विद्यालय/ श्री.मंगुभाई दत्ताणी विद्यालयाने २५ वर्षे यशस्वीरीत्या वाटचाल करून रौप्य महोत्सवात पदार्पण केले. अतिशय दिमाखात शाळेचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला. अशा प्रकारे शाळेचा विस्तार चारही दिशांना झालेला आहे. अशीच उत्तरोत्तर शाळेची भरभराट होऊन संस्थेचा व सर्व विद्यालयांचा प्रगतीचा आलेख उंच उंच व्हावा हीच सदिच्छा!