सुविद्या प्रसारक संघ

II सुविद्यया प्राप्यते यश: II

श्री. मंगुभाई दत्ताणी विद्यालय

योजना विद्यालय

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन विविध उपक्रमांतून शिक्षण देण्याचे पवित्र कार्य संस्थेने हाती घेतले. त्याची पूर्तता होण्यासाठी बोरीवली पूर्व या परिसरात सुविद्या प्रसारक संघाने 'योजना विद्यालय' (प्राथमिक विभाग) ही संस्थेची दुसरी शाळा जून १९८९ साली सुरु केली. सुसज्ज वर्गरचना, उत्तम अध्यापन, संगणक कक्ष, गणितीकक्ष, वाचनालय, इ-क्लास या अशा परिपूर्ण सोयींचा अंर्तभाव करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न शाळेत नियमित केला जातो. विविध आंतर शालेय स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले जाते. शाळेत आयोजित केलेल्या अनेकविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास द्रुढ होऊन ते भविष्यात गरुड भरारी घेण्यासाठी सज्ज होतात. सुविद्या प्राप्यते यश: या उक्तीप्रमाणे शाळेने उत्तरोत्तर प्रगती करत यशाची शिखरे आत्मसात केलेली आहेत.