सुविद्या प्रसारक संघ

II सुविद्यया प्राप्यते यश: II

श्री. मंगुभाई दत्ताणी विद्यालय

योजना विद्यालय

Calendar

Events

Dates and Events

Sr No. From Date To Date Event Name Event Description
1 13/06/2019 ते 14/06/2019 प्रशिक्षण शिक्षकांना गणिताचे प्रशिक्षण देण्यात आले.
2 15/06/19 प्रवेशोत्सव गुलाबाचे फूल आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मा. श्री सुशील हुले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नंतर मुलांना त्यांच्या इयत्तेनुसार पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
3 21/06/19 आंतरराष्ट्रीय योग दिन विविध योगासने करून योग दिन साजरा केला गेला. सहयोग संस्थेतील स्वयंसेवकांनी आपल्या दैनंदिन जीवनातील योगाचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी आमच्या शाळेला भेट दिली.
4 21/06/19 गणिती कक्ष सुविधा प्रसारक संघातर्फे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅथ्स लॅब सुरू करण्यात आली.
5 22/06/19 प्रशिक्षण डॉ. मिहीर पारेख यांनी मुलांमधील अध्ययन अक्षमता व त्यासंबंधीच्या तपासणीबद्दल शिक्षकांना माहिती दिली.
6 03/07/19 कालिदास दिन मुलांनी त्यांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित गायन सादर केले. पावसाळ्यात पावसाविषयी गाणी गाण्यातील आनंद सर्वांनी घेतला.
7 06/07/19 पालक सभा  महिंद्र अँड महिंद्रा सभागृहात पालकांची सभा घेण्यात आली. शिक्षकांनी अभ्यासक्रमाबद्दल माहिती सांगितली. या सभेसाठी सु. प्र. संघ सचिव मा. श्रीम. विद्या विद्या गोरे उपस्थित होत्या.
8 12/07/19 आषाढी एकादशी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थांनी परिसराभोवती वृक्षदिंडी काढली.
9 14/07/19 समुपदेशन श्रीम. मिनल दीक्षित यांच्या समुपदेशन सत्रासाठी बहुसंख्य पालक उपस्थित होते.
10 16/07/19 गुरुपौर्णिमा मुलांनी गुरु आणि शिष्यांच्या कथा सांगितल्या.
11 23/07/19 लोकमान्य टिळक जयंती शिक्षकांनी लोकमान्य टिळकांचे गुण व माहिती मुलांना गोष्टीरूपात सांगितली.
12 30/07/19 लोकमान्य टिळक स्मृती दिन आंतर शालेय स्पर्धा सुप्रसंघाच्या सुविद्यालयात सूर्यनमस्कार, रेखांकन, बेस्ट ऑफ वेस्ट इ. आंतरशालेय स्पर्धा घेण्यात आल्या.
13 31/07/19 दीप अमावस्या आपल्या दैनंदिन जीवनातील दिव्यांचा उपयोग आणि महत्त्व मुलांना सांगण्यात आले.
14 01/08/19 लोकमान्य टिळक स्मृतिदिन शिक्षकांनी लोकमान्य टिळकांच्या कथा सांगितल्या.
15 01/08/19 आंतरशालेय स्पर्धा - बक्षीस समारंभ सूर्यनमस्कार कॉम्प -1 बक्षीस व बेस्ट आउट वेस्ट मधील द्वितीय.आपल्या शाळेला शिल्ड मिळाली.
16 03/08/19 नागपंचमी शिक्षकांनी सापांविषयी वैज्ञानिक माहिती दिली.
17 14/08/19 रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा शिक्षकांनी रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा या सणांबद्दल माहिती सांगितली. मुलांनी नारळाच्या वेगवेगळ्या वस्तू बनवल्या. तसेच राख्या तयार केल्या आणि एकमेकांना बांधल्या. झाडांनाही राखी बांधण्यात आल्या. “झाडे वाचवा” असा संदेश प्रसारित केला.
18 15/08/19 स्वातंत्र्यदिन 73 व्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहण करण्यात आले व मुलांनी देशभक्तीपर गीते म्हटली.
19 19/08/2019 ते 22/08/2019 प्रथम घटक चाचणी 19/08/2019 मराठी 20/08/2019 गणित 21/08/2019 इंग्रजी 22/08/2019 परिसर अभ्यास
20 23/08/19 गोकुळाष्टमी शिक्षकांनी इंग्रजी शब्दांच्या हंडया तयार केल्या. मुलांनी त्या शब्दहंडया फोडल्या व शब्दांचे वाचन केले. शिक्षकांनी श्रीकृष्णाच्या कथा सांगितल्या.
21 30/08/19 ओपन हाऊस आणि मातृदिन पालकांसाठी ओपन हाऊस आयोजित करण्यात आले होते. तसेच पालकांसाठी श्रीमती शोभा नाखरे यांचे व्याख्यान झाले.
22 31/08/19 गणेशोत्सव गणपतीचे पूजन करण्यात आले. मुलांनी गणपतीची आरती आणि स्तोत्र म्हटले.
23 05/09/19 शिक्षक दिन यावर्षी 11 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला गेला. सुप्रसंघाचे सर्व सदस्य या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मा. श्रीम. दीपाली केळकर यांनी 'शब्दांची जादू' हा मराठी भाषेतील शब्दांच्या गमती-जमती सांगणारा मनोरंजक कार्यक्रम सादर केला.
24 23/09/2019 ते 28/09/2019 निरोगी अन्न आठवडा या आठवड्यात मुलांनी डब्यात सकस आहार आणावा अशी सूचना दिली होती. पालकांसाठी पौष्टिक पदार्थ तयार करण्याची स्पर्धा आयोजित केली होती.
25 30/09/2019 ते 07/10/2019 नवरात्रोत्सव विद्यार्थ्यांकरिता स्मरणशक्ती, शब्दसंपत्ती, चित्रकला, वक्तृत्व इ. स्पर्धा आयोजित केल्या होत्या. तसेच भोंडला आणि पाटीपूजन करण्यात आले.
26 02/10/19 महात्मा गांधी जयंती / लालबहादूर शास्त्री जयंती स्वच्छता अभियान' मोहीमेच्या अंतर्गत या दिवशी प्रभात फेरी काढण्यात आली. मुलांनी स्वच्छतेसाठी घोषणा दिल्या व वर्गांची स्वच्छता केली.
27 15/10/19 पुस्तक जत्रा विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी व त्यांना हाताळण्यासाठी अनेक प्रकारची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती.
28 16/10/2019 ते 19/10/2019 संकलित मूल्यमापन - 1 16/10/2019 परिसर अभ्यास 17/10/2019 मराठी. 18/10/2019 गणित. 19/10/2019 इंग्रजी
29 23/10/2019 ते 05/11/2019 दिवाळी सुट्टी सुट्टी
30 14/11/19 बालदिन मुलांसाठी आनंद मेळावा आयोजित केला गेला. मुलांना फुलपाखरू उद्यानात नेण्यात आले. मुलांनी वेगवेगळ्या खेळांचा आनंद घेतला.
31 23/12/2019 ते 25/12/2019 ख्रिसमस सुट्टीतील सुट्टी
32 27/12/19 गणित जत्रा मुलांसाठी गणितातील वेगवेगळे खेळ व कृतींचे आयोजन करण्यात येईल.
33 01/01/20 नववर्ष दिन मुलांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन हा दिवस साजरा करण्यात येईल.
34 03/01/20 बालिकादिन / सावित्रीबाई फुले जयंती मुली सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करतील . सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल माहिती सांगणे .
35 06/01/2020 ते 08/01/2020 क्रीडा स्पर्धा सांघिक तसेच वैयक्तिक स्पर्धा घेण्यात येतील
36 12/01/20 राष्ट्रीय युवा दिन आणि स्वामीविवेकानंद जयंती स्वामीविवेकानंद जयंतीसाजरी करणे.
37 15/01/20 मकरसंक्रांती मुलांसाठी पतंग बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात येईल.
38 21/01/2020 ते 24/01/2020 द्वितीय घटक चाचणी 21/01/2020 मराठी. 22/01/2020 गणित. 23/01/2020 इंग्रजी 24/01/2020 परिसर अभ्यास
39 26/01/20 प्रजासत्ताक दिवस राष्ट्रीय एकात्मता दाखवणारा कार्यक्रम विद्यार्थी सादर करतील
40 30/01/20 हुतात्मा दिन हुतात्मा दिनाचे महत्व सांगणे.
41 01/02/20 रथसप्तमी विद्यार्थ्यांन कडून सूर्यनमस्कार करून घेणे .सूर्यस्तुती म्हणून घेणे . विद्यार्थ्यांना सौरऊर्जेचे महत्व सांगणे.
42 19/02/20 शिवजयंती विद्यार्थ्यांकडून किल्ल्याची प्रतिकृती तयार करून घेणे. शिवरायांचा पोवाडा म्हणणे.
43 08/03/20 महिला दिन पालकांसाठी उदबोधन वर्ग ठेवणे.
44 09/03/20 होळी होळी व धूलिवंदन दिनाचे महत्व सांगणे
45 24/03/20 गुढीपाडवा हिंदू नववर्षाचे स्वागत करणे.
46 02/04/20 रामनवमी रामायणातील गोष्टी सांगणे.
47 01/04/2020 ते 04/04/2020 संकलित मूल्यमापन - 2 07/04/2020 मराठी. 08/04/2020 गणित. 09/04/2020 इंग्रजी 11/04/2020 परिसर अभ्यास
48 06/04/2020 ते 15/04/2020 अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त मार्गदर्शन अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे.
49 27/04/20 निकाल 28/04/2020 रोजी निकाल जाहीर करणे.
50 02/05/2020 ते 14/06/2020 उन्हाळी सुट्टी 02/05/2020 ते 15/06/2020

Holidays List